Prayog In Marathi – मराठी व्याकरण प्रयोग

prayog in marathi :- पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. वाक्यातील सर्वांत महत्त्वाचा शद्व म्हणजे ‘क्रियापद’ होय. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात जो असतो त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. ही क्रिया कर्त्याशीच न थांबता ती केव्हा केव्हा पुढे जाते व ज्याच्यावर ती घडते ते त्याचे ‘कर्म’. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक आहेत. वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते.

आपण जे बोलतो. कधी ते बोलणे क्रिया करणाऱ्यास म्हणजे कर्त्यास उद्देशून केले जाते. तर आपण कधी कर्माला उद्देशून न बोलता क्रियापदाच्या अर्थास उद्देशून बोलतो. कर्ता-कर्म-क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक आहेत. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्परसंबंधालाच प्रयोग असे म्हणतात.

प्रयोग हा शब्द्व संस्कृत (प्र+युज योग) आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते.

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते. तिलाच व्याकरणात ‘प्रयोग’ असे म्हणतात.

prayog in marathi :- प्रयोगाचे तीन प्रकार आहेत. १. कर्तरी प्रयोग, २. कर्मणी प्रयोग, ३. भावे प्रयोग.

WhatsApp Group Join Now
Prayog In Marathi - मराठी व्याकरण प्रयोग

Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार

1 कर्तरी प्रयोग Kartari Prayog In Marathi

तो गाणे गातो. या वाक्यात ‘तो’ हा कर्ता ‘गाणे’ हे कर्म व गातो हे क्रियापद आहे. या प्रयोगात क्रियापद हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. म्हणजेच येथे क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते किंवा क्रियापदावर कर्ता हा आपली हुकमत चालवितो म्हणून तो कर्तरी प्रयोग होय.

किंवा वाक्यामध्ये जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे स्वरूप ठरते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगामध्ये कर्ता हा धातुरूपेश असतो. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात.

उदा.:

  1. मी शाळेतून आताच आलो. (प्रथमान्त कर्ता)
  2. शिक्षक मुलांना शिकवतात. (द्वितीयान्त कर्म)
  3. राम आंबा खातो. (प्रथमान्त कर्म)

कर्तरी प्रयोगाचे प्रकार – Types Kartari Prayog In Marathi

अ) सकर्मक कर्तरी प्रयोग: कर्तरी प्रयोगातील क्रियापद जेव्हा सकर्मक असते तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या प्रयोगात कर्म असते त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा: ती गाणे गाते.

ब) अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या प्रयोगामध्ये क्रियापद अकर्मक असते त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. किंवा ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. 

उदा. ती जाते.

  1. कर्तरी प्रयोगात नेहमी कर्ता प्रथमा विभक्तीत असतो.
  2. कर्म हे प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.
  3. कर्तरी प्रयोगात वाक्यात कर्म नसेल तर क्रियापद कर्त्याप्रमाणेच असते.
  4. कर्तरी प्रयोगात भूतकाळ व विध्यर्यामध्ये अकर्मक कर्तरी वाक्य आढळते.
  5. कर्तरी प्रयोगात भविष्यकालीन वाक्यरचनेत क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नसून पुरुष व वचनानुसार बदलते.

ling Badla Marathi – माहिती मराठीमध्ये नियम आणि उदाहरणे

2 कर्मणी प्रयोग – karmani prayog in marathi

मुलाने आंबा खाल्ला. मुलीने आंबा खाल्ला.

पहिल्या वाक्यात ‘मुलाने’ हा कर्ता व आंबा हे कर्म आहे. तर दुसऱ्या वाक्यात मुलाने ऐवजी ‘मुलीने’ असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप खाल्ला तसेच राहिले. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे.

ज्या वाक्यात कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तो कर्मणी प्रयोग होय. किंवा जेव्हा वाक्यात क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार येते व त्यानुसारच त्याचे रूप बदलते त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. 

उदा:

वाक्यकर्ताविभक्तीकर्मक्रियापद
मीनाने गाणे म्हटलेमीनानेतृतीयागाणेकर्मानुसार
मला घर सापडलेमलाचतुर्थीघरकर्मानुसार
महेशकडून काम करून घेतलेमहेशकडूनपंचमीकामकर्मानुसार
रूपाच्याने भाषण म्हणवलेरूपाच्यानेषष्ठीभाषणकर्मानुसार

कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये

  1. कर्मणी प्रयोगात ‘कर्म’ नेहमी प्रथमा विभक्तीत असते.
  2. कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो.
  3. कर्ता सामान्यतः तृतीयेत असतो पण काही वेळा कर्ता हा पंचमी, चतुर्थी, षष्ठीतसुद्धा असू शकतो.
  4. कधी-कधी कर्ता शद्वयोगी अव्ययान्त असतो.

karmani prayog in marathi :- कर्मणी प्रयोगाचे विविध प्रकार आढळतात.

१. प्रधान कर्तृक कर्मणी, २. शक्य कर्मणी, ३. समापन कर्मणी, ४. प्राचीन कर्मणी, ५. नवीन कर्मणी.

१. प्रधानकर्तृक कर्मणी : ज्या प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असून बहुतेक करून कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा.

  1. तिने गाणे म्हटले.
  2. माधुरीने नृत्य केले.
  3. शिपायाने चोर पकडला.

२. शक्य कर्मणी : ज्या वाक्यात क्रियापदाने शक्यता सुचविलेली असते तो शक्य कर्मणी प्रयोग होय.

उदा.:

  1. माझ्याच्याने जिना चढवतो.
  2. मीनाला अजून गाणे म्हणवते.
  3. राजाला प्रजेचे संरक्षण करवते.

३. समापन कर्मणी : वाक्याचा कर्ता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.

उदा. : 

  1. त्याची गोष्ट लिहून झाली.
  2. तिचे गाणे गाऊन झाले.
  3. त्याचे काम करून झाले.
  4. माझे भाषण म्हणून झाले.

prayog in marathi : ४. प्राचीन कर्मणी : प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ‘ज’ हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, देईजे अशी रूपे ज्या वाक्यात येतात त्यास प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणतात.

उदा. :

  1. नळे इंद्रासी असे बोलिजे.
  2. जो जो परमार्थ लाहो.

५. नवीन कर्मणी: कर्मणी प्रयोगात कर्त्यास ‘कडून’ हा शद्वयोगी अव्यय लावून नवीन पद्धतीने रचना करण्याचा प्रकार म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग होय.

उदा. : 

  1. शिपायाकडून चोर पकडला गेला.
  2. रामाकडून रावण मारला गेला.
  3. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.

भावे प्रयोग – bhave prayog in marathi

bhave prayog in marathi :- जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. अशा वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा. :

  1. मधूने लवकर जावे.
  2. त्यांनी त्याला परमेश्वर मानले.
  3. शिकाऱ्याने हरणास पकडले.

वरील वाक्यांतील क्रियापदे पाहा. जावे, मानले, पकडले ही क्रियापदे कोणाप्रमाणे चालतात. हे त्यांचे कर्ता अथवा कर्म बदलून पाहा. मधूने या कत्यऐिवजी आम्ही, तुम्ही, त्यांनी, तिने वगैरे शद्व बदलूनसुद्धा जावे. या क्रियापदांत काही फरक पडत नाही.

त्याला किंवा हरणास हे शग कर्म आहेत. त्यांच्याऐवजी लिंग वचन पुरुष बदलून दुसरे कर्म टाकून पाहा असे दिसेल की क्रियापदांत काही फरक पडत नाही. येथील सर्व क्रियापदे नपुंसकलिंगी, तृतीयपुरूषी एकवचनी आहेत.

या प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने मूळ कर्ता व मूळ कर्म ही दोन्ही गौण असतात.

भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये

  1. क्रियापद हे नेहमी तृतीया पुल्लिंग, नपुंसकलिंग, एकवचनी असते व स्थिर असते.
  2. कर्ता बहुधा तृतीयेत किंवा चतुर्थेत असतो.
  3. कर्म असेल तर ते द्वितीयेत असते.
  4. भावे प्रयोगातील काही वाक्यात ‘कर्म’ नसते.

भावे प्रयोगाचे प्रकार

१. सकर्मक भावे प्रयोग , २. अकर्मक भावे प्रयोग. ज्या वाक्यात कर्म आहे तो सकर्मक भावे प्रयोग होय व ज्या वाक्यात कर्म नाही त्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

सकर्मक भावे प्रयोगाचे उदा.

  1. मंत्र्यांनी सभागृहास सांगावे.
  2. रामाने रावणास मारले.
  3. सचिनने षटकार मारला
  4. नेत्यांनी भाषणे केली.

अकर्मक भावे प्रयोगाची उदा.:

  1. मुलांनी खेळावे.
  2. धाडसाने वागावे.
  3. प्रेमाने बोलाने.

मिश्र किंवा संकर प्रयोग

एखाद्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग असतो किंवा त्याच वाक्यामध्ये कर्तरीप्रमाणे कर्मणी भावे हे दोन्ही प्रयोग असतात. अशा प्रयोगास मिश्र किंवा संकर प्रयोग म्हणतात.

किंवा ‘एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण आढळते त्या मिश्रणाला संकर असे म्हणतात.’ म्हणजेच संकर प्रयोग होय.

संकर प्रयोगाचे प्रकार

prayog in marathi : १. कर्तृ-कर्मसंकर : ज्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात त्याला कर्तृ-कर्मसंकर प्रयोग म्हणतात. उदा. तू कविता म्हटलीस

२. कर्म भावसंकर ज्या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात त्यास कर्म-भावसंकर प्रयोग म्हणतात. उदा. आईने मुलीला निजवले.

३. कर्तृ-भाव संकर : ज्या वाक्यामध्ये कर्तरी व भावे या दोन प्रयोगाच्या छटा एकत्र आढळतात त्यास कर्तृ-भाव-संकर प्रयोग म्हणतात. उदा.: तू गाईला घालविलेस.

कर्तृ-कर्म-संकर व कर्तृ-भाव-संकर प्रयोग हे हे बहुधा द्वितीय पुरुषी कर्ता असताना होतात

वाक्यकर्ताविभक्तीकर्मक्रियापद
शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसलाशिकाऱ्यालावाघदिसलाकर्मणि
रवीला पोळी आवडतेरविपोळीआवडतेकर्मणि
सीमाला तमिळ येतेसीमालातमिळयेतेकर्मणि
मंजूला साडी शोभतेमंजूलासाडीशोभतेकर्मणि

वरील वाक्यांतील क्रियापदांकडे वेगळ्या भूमिकेतून पाहणारे काही व्याकरणकार आहेत. रा. भि. जोशी, खेर यांना वरील क्रियापदांचे कर्तृपद चतुर्थ्यन्त शद्वामध्ये (म्हणजे शिकाऱ्याला, रवीला वगैरे) शद्वांमध्ये आहे असे वाटते. अशा वेळी वाघ, पोळी, तमिळ वगैरे शद्ब कर्म पदी येतात व ही क्रियापदे सकर्मक ठरून इथे कर्मणी प्रयोग होतो. असे त्यांना का वाटते ? यांचे एक कारण असे की, इंग्रजीत ही क्रियापदे सकर्मक आहेत.

प्रारंभी अकर्मक वाटणारी क्रियापदे इंग्रजीच्या प्रभावामुळे ‘सकर्मक’ बनू लागली असे म्हणता येईल. इंग्रजी भाषेतून मराठी व्याकरणात अनेक शद्व घेतले. इंग्रजी व्याकरणातून अनेक कल्पना, विरामचिन्हे, वाक्यपृथ्थकरण, वाक्यरूपांतर अशा अनेक गोष्टी मराठी व्याकरणात स्वीकारल्या आहेत. मग क्रियापदाच्या स्वरूपातला असा बदल जर अधिक सुलभ व अर्थवाहक होत असेल तर तो स्वीकारायला काय हरकत आहे ?

Sandhi In Marathi – संधी व संधिनियम मराठीमध्ये

अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया

अभ्यास

१. प्रयोग कसा ओळखावा एखादा प्रयोग ओळखून खुलासा लिहा.

२. प्रयोग म्हणजे काय ? प्रयोगाचे प्रमुख प्रकार कोणते ?

३. मिश्र किंवा संकर प्रयोग कशास म्हणतात ? त्यांचे प्रकार सांगून प्रत्येकी एक- एक उदाहरण द्या.

४. खालील वाक्यांचे प्रयोग ओळखा व स्पष्ट करा.

  1. वाऱ्याने झाडे पाडली.
  2. शिवाजी थोर योद्धा होता.
  3. वडिलांनी मुलीला सासरी पाठविली.
  4. हे कापड महाग आहे.
  5. त्याने मागे वळून बघितले.
  6. तुकाराम बोवांनी हा ग्रंथ लिहिला.
  7. विज्ञानाने माणसाला सुखी केले.
  8. मुलांचा गोंधळ उडाला.
  9. डॉक्टरांनी रोग्यास वाचवले.
WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *