Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार

kal in marathi :- वाक्यातील काळ कोणता ? हे वाक्य कोणत्या काळातले आहे. या सर्वांचा अभ्यास या प्रकरणात करावयाचा आहे. वाक्यातील क्रियापदावर कोणती क्रिया घडते. हे जसे कळते तसे त्यावरून ती क्रिया करणारा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी हे लिंगवचन कळते. तर ती क्रिया कधी घडली. त्या वाक्याचा काळ कोणता हे समजते. म्हणजे व्याकरणात काळाचा अभ्यास करणे हे गरजेचे आहे. आपणांस दिलेल्या वाक्यावरून त्यातील वेळेचा बोध होतो. त्यावरून काळ निश्चित करता येतो. क्रिया घडून गेली आहे का ? का घडणार आहे ? किंवा घडत आहे. या सर्वांचा अभ्यास काळविचार या प्रकरणात करावयाचा आहे.

एकूण तीन काळ आहेत. भाषेचा व्यवहार करताना काळाचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळून येतो. भाषेचा अभ्यास करताना काळाचा अभ्यासही करणे गरजेचे आहे.

पुढील वाक्ये पाहा –

  1. रमेश पुस्तक वाचतो आहे.
  2. रमेशने पुस्तक वाचले.
  3. रमेश पुस्तक वाचेल.

वरील तीन वाक्यांवरून काळाचा बोध होतो. यावरून काळाचे प्रमुख प्रकार तीन पडतात. क्रियापदाच्या काही रूपांवरून काळाचा बोध होतो हे आपण पाहिले आहे. तसेच क्रियापदाच्या रूपावरून विशेषकारच्या भावना व अर्थाचा बोध होतो. क्रियापदाला संस्कृतमध्ये ‘आख्यात’ आसे म्हणतात. क्रियापदांना तो, ला, ईल, ई, ऊ, वा, वगैरे प्रत्यय लागल्यामुळे विविध काळ व अर्थ यांची रूपे तयार होतात.

ling Badla Marathi – माहिती मराठीमध्ये नियम आणि उदाहरणे

धातूंना वेगवेगळे प्रत्यय लागून त्यांनी तिन्ही लिंगी, तिन्ही पुरुष यांवरून क्रियापदाची रूपे तयार होतात. काळाचे प्रमुख प्रकार तीन आहेत व त्या प्रत्येकी काळाचे चार पोटप्रकार पडतात. त्यांचा नमुना पुढील तक्त्यात दिला आहे.

प्रकारवर्तमानकाळभूतकाळभविष्यकाळ
साधामी पुस्तक वाचतो.मी पुस्तक वाचलेमी पुस्तक वाचीन
अपूर्णमी पुस्तक वाचत आहेमी पुस्तक वाचत होतोमी पुस्तक वाचत असेन
पूर्णमी पुस्तक वाचलं आहेमी पुस्तक वाचले होतेमी पुस्तक वाचले असेन
रितीमी पुस्तक वाचत असतोमी पुस्तक वाचत असेमी पुस्तक वाचत जाईन
उद्देशमी पुस्तक वाचणार आहेमी पुस्तक वाचणार होतोमी पुस्तक वाचणार असेन

■ काळाचे प्रकार – Kal In Marathi

अ) वर्तमानकाळ – vartman kal in marathi

जेव्हा वाक्यामध्ये क्रिया चालू असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास ‘वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

vartman kal in marathi example :- उदा.:

  1. मी चित्र काढतो.
  2. राम आंबा खातो.

वर्तमानकाळाचे पोटप्रकार

vartman kal in marathi example : १. साधा वर्तमानकाळ : ज्या वाक्यामध्ये क्रिया ही चालू काळात घडते आहे म्हणून त्या काळास ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तक वाचतो.
  2. सुधा निबंध लिहिते.
  3. रवि खेळतो.

२. रीती वर्तमानकाळ : एखाद्या वर्तमानकाळातील क्रिया सारखी-सारखी घडत असते किंवा वारंवार घडताना दिसते. ही क्रिया सर्व काळी सारखीच लागू असते. या वर्तमानकाळाबरोबर रीतीचाही बोध होतो. म्हणून या वर्तमानकाळास ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. : 

  1. सुरेश पुस्तक वाचत आहे.
  2. सुधा निबंध लिहीत आहे.
  3. रवि खेळत आहे.

३. अपूर्ण वर्तमानकाळ : येथे वर्तमानकाळात क्रियेची अपूर्णता दाखविली जाते म्हणून त्याला ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात. किंवा वर्तमानकाळातील क्रियापदाची क्रिया चालू आहे पण ती पूर्ण झालेली नसते. तेथे क्रियेचा अपुरेपणा दिसून येतो. अशा काळास ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तक वाचत आहे.
  2. सुधा निबंध लिहीत आहे.
  3. रवि खेळत आहे.

४. पूर्ण वर्तमानकाळ : संयुक्त क्रियापदावरून क्रिया ही वर्तमानकाळातच पूर्ण झाली असेल तर तो पूर्ण वर्तमानकाळ होय. किंवा क्रियापदावरून क्रिया आताच पूर्ण झालेली आहे. या क्रियेवरून वर्तमानकाळाचा बोध होतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असे कळते. अशा काळास ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेशने पुस्तक वाचले आहे.
  2. सुधाने निबंध लिहिला आहे.
  3. रवि खेळला आहे.

५. उद्देश वर्तमानकाळ : क्रियापदावरून काळाचा बोध होतो पण त्याचबरोबर वाचण्याचा, लिहिण्याचा, खेळण्याचा उद्देश पण दिसून येतो. म्हणून जेव्हा वर्तमानकाळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू पण समजतो. तेव्हा त्यास उद्देश वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तके वाचणार आहे.
  2. सुधा निबंध लिहिणार आहे.
  3. रवि खेळणार आहे.

Sandhi In Marathi – संधी व संधिनियम मराठीमध्ये

ब) भूतकाळ :

kal in marathi : जेव्हा वाक्यातील क्रिया पूर्वी किंवा आधीच घडून गेली आहे असा बोध होतो. तेव्हा त्या काळास ‘भूतकाळ’ म्हणतात.

उदा.:

  1. मी गावी गेलो होतो.
  2. आम्ही काल पावसात नाचत होतो.

भूतकाळाचेही चार पोटप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे –

१. साधा भूतकाळ : जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून क्रिया घडून गेलेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेशने पुस्तक वाचले.
  2. सुधाने निबंध लिहिला.
  3. रवि खेळला.

२. रीती भूतकाळ : वाक्यामधील क्रियापदावरुन काळाचा तर बोध होतोच पण त्या क्रियापदाच्या रूपावरून रीतीचाही बोध होतो म्हणून त्या काळास ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.:

  1. सुरेश पुस्तक वाचत असे.
  2. सुधा निबंध लिहीत असे.
  3. रवि खेळत असे.

३. अपूर्ण भूतकाळ : भूतकाळात क्रिया चालू होती पण ती पूर्ण झाली नव्हती त्याला ‘अपूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.:

  1. सुरेश पुस्तक वाचत होता.
  2. सुधा निबंध लिहीत होती.
  3. रवि खेळत होता.

kal in marathi :- ४. पूर्ण भूतकाळ : वाक्यातील क्रिया भूतकाळातच पूर्ण झाली आहे असे समजते तेव्हा त्या काळास ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेशने पुस्तक वाचले.
  2. सुधाने निबंध लिहिला होता.
  3. रवि खेळला होता.

५. उद्देश भूतकाळ : क्रिया भूतकाळात घडत असते पण त्याचबरोबर कर्त्याचा क्रिया करण्याचा उद्देशही समजतो म्हणून यास ‘उद्देश भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तक वाचणार होता.
  2. सुधा निबंध लिहिणार होती.
  3. रवि खेळणार होता.

क) भविष्यकाळ – bhavishya kal in marathi

वाक्यातील क्रिया अजून पुढे घडणार आहे किंवा क्रिया होण्याची शाश्वती दिली जाते किंवा क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्यास ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. मी वर्गात पहिला येणार आहे.
  2. उद्या सभेला नेते येणार आहेत.

भविष्यकाळाचे पोटप्रकार –

bhavishya kal in marathi १. साधा भविष्यकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढील काळात होणार आहे असा बोध होतो. तेव्हा या काळास ‘साधा भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. : 

  1. सुरेश पुस्तक वाचेल.
  2. सुधा निबंध लिहील.
  3. रवि खेळेल.

२. रीती भविष्यकाळ : भविष्यकाळातील क्रियापदावरून रीतीचाही बोध होतो, त्या काळाग रीती भविष्यकाळ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तक वाचत राहील.
  2. सुधा निबंध लिहीत राहील.
  3. रवि खेळत राहील.

३. अपूर्ण भविष्यकाळ : वाक्यातील क्रियापदावरून क्रिया अपूर्ण राहणार आहे असा जेव्हा बोध होतो म्हणून अशा काळास ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. : 

  1. सुरेशने पुस्तक वाचले असेल. 
  2. सुधाने निंबंध लिहिला असेल.
  3. रवि खेळला असेल.

४. पूर्ण भविष्यकाळ : वाक्यातील क्रिया पूर्ण झाली असेल तर त्या काळास ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. पुढील उदाहरणावरून क्रिया पूर्ण झालेली दिसून येते.

५. उद्देश भविष्यकाळ वाक्यातील क्रियापदांच्या भविष्यकाळाबरोबरच क्रिया करण्याचा उद्देश पण समजतो. अशा काळास ‘उद्देश भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. :

  1. सुरेश पुस्तक वाचणार असेल.
  2. सुधा निबंध लिहिणार असेल.
  3. रवि खेळला असेल.

क्रियापदाच्या रूपांवरून निरनिराळ्या काळाचा बोध होतो. पण केव्हा केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता. उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू, उद्देश, प्रयोजन समजते. यालाच व्याकरणामध्ये अर्थ म्हटले जाते. अर्थाचे चार प्रकार पडतात.

१) स्वार्थ, २) आज्ञार्थ, ३) विध्यर्थ, ४) संकेतार्थ. व्याकरणात असे तीन काळ महत्त्वाचे आहेत तसेच हे चार अर्थही महत्त्वपूर्ण आहेत.

अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया

अभ्यास

१. काळाचे प्रकार कोणते ? काळ म्हणजे काय ?

२. पुढील वाक्यातील काळ ओळखा.

अ) यंदा फार मोठी यात्रा भरेल.

ब) तुम्ही सांगाल ते मी ऐकतो.

क) एका गावात एक ब्राह्मण राहिला होता.

ड) तुम्ही ही जागा मोकळी करा.

इ) फार जोरदार पाऊस पडला.

ई) आम्ही पूरग्रस्तांना भेट देणार आहोत.

ऊ) आमच्या गावात खूप मोठं देऊळ आहे.

ए) भारतात एकत्र कुटुंब पद्धती विकसित आहे.

३. पुढील क्रियापदांची रूपे वाक्यात वापरून वाक्य पुन्हा लिहा व त्याचा काळ सांगा. येऊ, जाऊ, खेळू, खाऊ, खेळत असू, यावा, करी, करशील, करील, जाशील आहे, खेळतो, आहात इत्यादी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *