Vibhakti in Marathi – विभक्ती मराठी व्याकरण व त्याचे प्रकार मराठी मध्ये

vibhakti in marathi :- जेव्हा शब्द्वास ला, स, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा त्यास विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. उदा. : शामला, अण्णास, शिक्षकांना असे विभक्ती प्रत्यय शद्वांना लागताना दिसतात.

शद्वाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शद्वयोगी अव्यय लागत असताना त्या शद्वाच्या मूळ रूपात बदल होतो. त्यास ‘सामान्यरूप’ असे म्हणतात.  उदा. : देव – देवाचे (‘देवा’ हे सामान्यरूप) तळे – तळ्यात (‘तळ्या’ हे सामान्यरूप)

विभक्ती – Vibhakti In Marathi

वाक्यामध्ये प्रत्यय लागून नामाचे व सर्वनामाचे एक रूप तयार होते. त्या रूपाने वाक्यातील इतर संबंधित शद्वांशी आलेला संबंध समजतो. या रूपाला विभक्ती असे म्हणतात. नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो तो लिंगभेदामुळे व वचनभेदामुळे होतो. नामाच्या रूपात विभक्तीमुळे बदल होतो.

हे आर्टिकल ही वाचा : Prayog In Marathi – मराठी व्याकरण प्रयोग

कारक

vibhakti in marathi grammar : वाक्यातील शद्वांचा त्यातील मुख्य शद्वाशी म्हणजेच क्रियापदाशी जो संबंध येतो किंवा इतर शद्वाशी काही ना काही संबंध येतो. त्याला ‘कारक’ असे म्हणतात.

कारकचे प्रकार – Types Of Vibhakti In Marathi

१) कर्ताकारक, २) कर्मकारक, ३) करणकारक, ४) संप्रदानकारक, ५) अपादानकारक, ६) संबंधकारक, ७) अधिकरणकारक, ८) संबोधनकारक.

कारकार्थ

वाक्यातील नामाचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्यास कारक असे म्हणतात. हा संबंध जो अर्थ दाखवितो त्यालाच ‘कारकार्थ’ असे म्हणतात.

हे आर्टिकल ही वाचा :- Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार

उपपदार्थ

वाक्यामध्ये क्रियापदाबरोबर इतरही शद्व असतात. क्रियापदाशिवाय नामाचा इतर शद्वांशी आलेला संबंध हा जो अर्थ दाखवितो त्यालाच उपपदार्थ असे म्हणतात. विभक्तींचे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या रूपात कोणते बदल होतात ते पुढील तक्त्यावरून दिसून येते. examples of vibhakti in marathi

विभक्तीएकवचनअनेकवचनकारकार्थ
प्रथमाकर्ता
द्वितीयास, ला, तेस, ला, ना, तेकर्म
तृतीयाने, ऐ, शीनी, शी, हीकरण
चतुर्थीस, ला, तेस, ला, ना, तेसंप्रदान
पंचमीऊन, हूनऊन, हूनअपादान
पष्ठीचा, ची, चेचे, च्या, चीसंबंध
सप्तमीत, ई, आत, ई, आअधिकारण
संबोधननोहाक मारणे

विभक्तीचे कारकार्थ व उपपदार्थ

prathama vibhakti in marathi :- १. प्रथमा कारकार्थ

  1. कर्ता अनिल आला.
  2. कर्म – अनिलने घड्याळ आणले.
  3. अधिकरण मी फर्लांगभर चाललो.

उपपदार्थ

  1. मूल्य – एकोणीस रुपये लिटर दूध.
  2. परिणाम पाच डझन केळी आणली.
  3. अंतर – सांगलीहून कोल्हापूर ७० कि.मी. आहे.
  4. अवधी – मी दोन महिने पुण्यात होतो.

२. द्वितीया – कारकार्थ:

  1. कर्म मुले पुस्तक वाचतात.
  2. स्थळ – आम्ही डोंगरात खूप फिरलो.
  3. काळ – त्या दिवशी दिवसभर शाळा होती.

३. तृतीया – कारकार्थ :

  1. कर्ता – पंतप्रधानांनी भेट दिली.
  2. करण – आपण हाताने काम करतो.
  3. अधिकारण – नेहमी रस्त्याच्या कडेने चालावे.

उपपदार्थ

  1. हेतू – तो स्वार्थीपणाने काम करतो.
  2. मूल्य – शेंगतेल ६० रुपये किलो झाले आहे.
  3. अवधी – मी तीन दिवस दवाखान्यात होतो.
  4. साहित्य वस्त्र परिधान करून तो निघाला.
  5. न्यूनता – तो मूकबधीर होता.
  6. अधिकता – चाणाक्ष बुद्धीचा
  7. तुलना तो अतुलनीय होता.
  8. रीती – तो अहंकाराने वागतो

४. चतुर्थी कारकार्थ:

  1. कर्ता मला ते समजते.
  2. कर्म राजाने प्रधानास बोलावले.
  3. संप्रदान – भूकंपग्रस्तास अन्नपाणी दिले.
  4. अपादान – नेतेपदास तो मुकला.
  5. अधिकरण कपड्याला घाणीचे डाग पडले.

उपपदार्थ

  1. उद्देश तो अपयशाला भितो.
  2. योग्यता – मुलगी उपवर झाली.
  3. मूल्य – शेरास सव्वाशेर.
  4. नाते मला दोन भाऊ दोन बहिणी आहेत.
  5. मर्यादा – दुकानात दहा मिनिटात जाऊन येतो.

५. पंचमी कारकार्थ:

  1. अपादान मी झाडावरून पडलो.
  2. करण – माझ्या हातून हे शक्य नाही.

उपपदार्थ

  1. तुलना – सुस्मितापेक्षा ऐश्वर्या सुंदर आहे.
  2. अंतर – घरापासून शाळा लांब आहे.

६. षष्ठी कारकार्थ:

  1. कर्ता माझे भाषण झाले.

उपपदार्थ

  1. अधिकरण तो रात्रीचा अभ्यास करतो.
  2. मूल्य – त्याने मेहनतीने पैसा गोळा केला.
  3. हेतू – जेवणाचे ताट करा.
  4. जन्यजनक – माझी आई मला सानेगुरुजींची गोष्ट सांगत असे.

७. सप्तमी कारकार्थ

  1. १. अधिकरण मागील वर्षी मी कॉलेजात होतो.
  2. उपपदार्थ
  3. २. करण- तोंडी निरोप घेतला.

उपपदार्थ

  1. हेतू – मी त्यामुळे संकटात पडलो.
  2. संबंध सर्व विभागात प्रथम आलो.
  3. सर्वोत्तम – अडाण्यात अडाणी तो एकच होता.

प्रत्येक विभक्तीला कारकार्थ व उपपदार्थ असतात.

१. कर्ताकारक

  1. गारा आकाशातून पडत होत्या.
  2. पहाटे पक्षी किलबिल करतात. 

vibhakti in marathi :- वरील वाक्यांत गारा व पक्षी हे शब्द्व कर्ता आहेत. या शद्वाला कसलाच प्रत्यक्ष लागलेला नाही.

२. कर्मकारक :

  1. राजूने गाणे म्हटले.
  2. महेशने मुलांना शिकवले.

वरील वाक्यांत गाणे, मुलांना हे शद्ध कर्म आहेत. पहिल्या वाक्यातील कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. तर दुसऱ्या वाक्यातील कर्मास ना हे प्रत्यय लागले आहे. प्रत्यक नसलेल्या शद्वाला अप्रत्यय कर्मकारक तर प्रत्यय लागलेल्या शद्वाला सप्रत्यय कर्मकारक म्हणतात.

३. करणकारक :

  1. सुईने काटा काढला.
  2. कानांनी आपण ऐकतो

सुईने, कानांनी ही क्रियेसाठी साधनाचा बोध करून देणारे नामरूप करणकारक आहेत.

४. संप्रदान कारक :

  1. मी त्यांना भेटायला जाणार आहे.
  2. तुम्ही शिक्षकास गुरुदक्षिणा द्या.

वरील वाक्यात त्यांना, शिक्षकास या शद्वाला विभक्ती प्रत्यय लागला आहे. म्हणून हे संप्रदानकारक आहेत.

५. अपादानकारक :

  1. मी गोव्याहून आलो.
  2. आमच्याहून ते श्रीमंत आहेत.

अपादान म्हणजे वियोग, भिन्नता होय. गोव्याहून, आमच्याहून हे अपादानकारक शद्व आहेत.

६. संबंधकारक :

  1. सोन्याचे दर वाढले.
  2. कागदाची नाव तयार केली.

या वाक्यात सोने व दर तसेच, कागद व नाव यांचा संबंध स्पष्ट केला आहे म्हणून हा संबंधकारक होय.

७. अधिकरणकारक :

  1. घरात तुम्ही कोठे होता ?
  2. मुले वर्गात बसली होती.

वरील वाक्यातील नामात, त, आत प्रत्यय लागला आहे. यावरून कोठे हा अर्थ समजतो. तेव्हा त्यास अधिकरणकारक असे म्हणतात.

८. संबोधनकारक :

  1. हे ईश्वरा, याला क्षमा कर.
  2. बंधूभगिनीनो, शांत बसा.

वरील वाक्यात, ईश्वरास व बंधूभगिनींना उद्देशून हाक मारली आहे. म्हणून त्यास संबोधनकारक असे म्हणतात.

अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया

अभ्यास

vibhakti in marathi grammar :- प्र. १ : पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा आणि त्याचे कारकार्थ व उपपदार्थ सांगा.

  1. त्यांना बहुमताने विजयी करा.
  2. पहाटे पहाटे मला जाग आली.
  3. विनोबांनी खूप पदयात्रा केल्या.
  4. कोल्हापूरहून आम्ही गडाला निघालो.
  5. फुलपाखरे बागेत विरहत होती.
  6. संताजीची घोडदौड सुरू झाली.
  7. मी सकाळी नऊ वाजता फोन केला.
  8. अप्पा मळ्यातून घरात आले.

प्र. २ : पुढील शद्वांना विभक्तीप्रत्यय जोडून त्यांची सामान्यरूपे कशी होतात ते लिहा. तळे, आकाश, छत, माळा, धडा, फडके, भीती, संगीत, देव.

प्र. ३ : विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व सामान्यरूपे म्हणजे काय ते उदाहरणासह सांगा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *