Samas In Marathi – समास व समासाचे प्रकार मराठी मध्ये

samas in marathi :- आपण दररोजच्या बोलण्यात विविध शद्वांचा वापर करतो. काही गोष्टी सांगण्यासा आपण अनेक जोडशद्र वापरतो. ते वापरताना त्या दोन वा अधिक शांमधला परस्पर संबंध आपल्याला माहीत असतो म्हणूनच आपण ते शद्ध एकत्रित करुन लिहितो आणि बोलतो. उदाहरणार्थ, आकाशात चंद्र आणि तारे छान दिसतात. याऐवजी आकाशात चंद्रतारे छान दिसतात, असे आपण म्हणतो. तसेच बाबा ऋणातून मुक्त झाले. यापेक्षा बाबा ऋणमुक्त झाले, हे सोयीचे वाटते. मला कमरेसाठी पट्टा हवा आहे. त्यापेक्षा मला कंबरपट्टा हवा आहे. असे शदू ऐकण्यास बरे वाटते, गणपती आला म्हणण्याऐवजी गणेशागमन झाले, म्हणणे योग्य वाटते. अशा शद्वांनी भाषा शास्त्रशुद्ध वाटते व असे जोडशद्व व्यक्त करण्यात भाषेचा एक डौल दिसतो.

Samas In Marathi – सामासिक शद्र :

दोन किंवा अधिक शद्वांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशद्व तयार होतो त्यास ‘सामासिक शदू’ असे म्हणतात किंवा दोन किंवा अधिक पदे परस्परसंबंधांमुळे एकत्रित करण्यालाच ‘समास’ असे म्हणतात.

(सम् + अस) समास याचा अर्थ एकत्र करणे होय.

सामासिक शद्वाची फोड करणे किंवा सामासिक शदू कोणत्या शद्वापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांची फोड करुन दाखवणाऱ्या पद्धतीलाच विग्रह असे म्हणतात. व्याकरणामध्ये समास ओळखणे जसे महत्त्वाचे आहे तसे विग्रह करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. समासाचा विग्रह करताना पहिल्या पदातील अंत्य वर्ण व पुढच्या पदातील आद्यवर्ण यांचा संयोग होतो व जोडशद्द्व बनतो.

WhatsApp Group Join Now
Samas In Marathi - समास व समासाचे प्रकार मराठी मध्ये

samas in marathi examples : उदा :

सामासिक शद्धसमासाचा विग्रह
सूर्योदयसूर्याचा उदय
ऋणमुक्तऋऋणातून मुक्त
कंबरपट्टाकमरेसाठी पट्टा
आजन्मजन्मापासून मृत्यूपर्यंत
रोगमुक्तरोगातून मुक्त

Samas In Marathi – समासाचे प्रकार

  1. अव्ययीभाव समास
  2. तत्पुरुष समास
  3. द्वंद्व समास
  4. बहुव्रीही समास

Sandhi In Marathi – संधी व संधिनियम मराठीमध्ये

१. अव्ययीभाव समास:

Samas In Marathi :- या समासातील पहिले पद शक्यतो अव्यय असते व मुख्य असते. तसेच तो सामासिक शद्व क्रियाविशेषणाचे काम करतो. अशा समासाम ‘अव्ययीभाव समास’ म्हणतात.

उदा:- यथाशक्ती = शक्तीप्रमाणे

आकंठ = कंठापर्यंत

प्रतिदिन = प्रत्येक दिवशी

घरोघरी = प्रत्येक घरी

अचूक = चुकीशिवाय

यथाविधी = विधीप्रमाणे

तासन्तास = अनेक तास

विनाकारण = कारणाशिवाय

अन्यन्त्र = दुसऱ्याच ठिकाणी

पदोपदी = प्रत्येक पदाला

मरणापर्यंत = आमरण

शिस्त नसलेला = गैरशिस्त

निष्काळजी = काळजी नसलेला

२. तत्पुरुष समास :

Samas In Marathi :- ज्या समासातील पहिल्या पदापेक्षा दुसरे पद महत्त्वाचे असते व विग्रह करताना विभक्ती प्रत्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.

उदा:- मानवनिर्मित = मानवाने निर्मित (तृतीया)

घरमालक = पराचा मालक (षष्ठी)

भूमिगत = भूमीत गेलेला (सप्तमी)

राजरस्ता = राज्यासाठी रस्ता (चतुर्थी)

राजकन्या = राजाची कन्या (षष्ठी)

कमलनेत्र = कमलासारखे नेत्र (प्रथमा)

गृहसुख = घराला सुख (द्वितीया)

घरगडी = घरातील गडी (सप्तमी)

वरील उदाहरणांत विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाने जोडणी केली जाते म्हणून त्या विभक्तीचे नाव त्या समासास देतात.

Samas In Marathi – तत्पुरुष समासाचे प्रकार

अ) अलुक तत्पुरुष : पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही असा समास म्हणजे ‘अलुप तत्पुरुष समास’ होय.

(अलुक = लोप न होणारे) म्हणून ज्या विभवतीत तत्पुरुषात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही.

samas in marathi examples : उदा:-  युधिष्ठिर = युधि ष्ठिर

तोंडीलावणे =तोंडी लावणे

उद्योगपती = उद्योग पती

दंगामस्ती =दंगा मस्ती

अग्रेसर = अग्रे सर

पंकेरूह = पंके रूह

उपपद तत्पुरुष समास

ब) उपपद तत्पुरुष : ज्यामध्ये वाक्यात दुसरे पद धातुसाधित असते त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. कार, द, घ्न हे कृदंत आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही म्हणून त्यांना उपपद असे म्हणतात.

उदा:-  शास्त्रज्ञ = शास्त्र जाणणारा

देशस्थ = देशावर राहणारा

चित्रकार = चित्रे काढणारा

शेतकरी =  शेती करणारा

ग्रंथपाल  = ग्रंथाचे पालन करणारा

कर्मचारी =  काम आचरणारा

वारकरी = वारी करणारा

कविकार = कविता करणारा

दंडाधिकारी = दंड धारण करणारा

नञतत्पुरुष समास

क) नञतत्पुरुष : ज्या समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नजतत्पुरुष समास असे म्हणतात.

(अ, अन, न, ना, नि, गैर या नकारात्मक अक्षरांनी समास तयार होतो)

उदा:- निष्पाप = पापी नसलेला

नालायक = लायक नसलेला

अविनाश = विनाश न होणारा

अयोग्य = योग्य नव्हे ते

अनादर = आदर नसलेला

नापसंत = पसंत नसलेला

निरोगी = नाही रोग असा तो

नावडता = नाही आवडता तो

अनोळखी = ओळख नसलेला

अस्वच्छ = स्वच्छ नसलेला

कर्मधारय समास

Samas In Marathi :- ड) कर्मधारय : या समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास ‘कर्मधारय समास’ म्हणतात. तत्पुरुष समासातील पहिले पद हे विशेषण असते त्या दोन्ही पदाचा विभक्ती हा प्रथमेत असतो.

उदा:- नृसिंह = नर हाच सिंह

अखंडवंश = अखंड असा वंश

मुखकमला = कमलासारखे मुख

काव्यामृत = काव्य हेच अमृत

परमेश्वर = परम असा ईश्वर

रक्तचंदन = रक्त असे चंदन

महासागर = मोठा असा सागर

बालमन  = बाल असे मन

घनश्याम = घनासारखा श्याम

पुरुषोत्तम = उत्तम असा पुरुष

दूरदृष्टी = दूर अशी दृष्टी

मंगलमूर्ती = मंगल अशी मूर्ती

अमृतमधुर = अमृतासारखा मधुर

द्विगु समास

इ) द्विगु समास : ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते तो द्विगु समास होय. संपूर्ण शद्वाने समुदायाचा बोध होतो.

उदा:-  त्रिभुवन = तीन भुवनांचा समूह

चौघडी = चार घड्यांचा समूह

पाचुंदा = पाच पेंड्यांचा समूह

सप्तसूर्य = सात सूर्यांचा समूह

नवरात्र = नऊ रात्रींचा समूह

पंचपाळ = पाच पाळ्यांचा समूह

पंचारती = पाच आरत्यांचा समूह

सप्ताह = सात दिवसांचा समुदाय

षटकोन = सहा कोनांचा समुदाय

चौकोन = चार कोनांचा समूह

द्विदल = दोन दलांचा समूह

त्रिफळ = तीन फळांचा समूह

अष्टदिशा = आठ दिशांचा समुदाय

पंचवटी = पाच वडांचा समूह

मध्यमपदलोपी समास

Samas In Marathi :- ई) मध्यमपदलोपी समास: ज्या वाक्यामध्ये शद्वांचा समास करताना मधले संबंध दाखवणारे पद किंवा शदू गाळावे लागतात त्याला ‘मध्यमपदलोपी समास’ असे म्हणतात.

उदा:- कांदापोहे = कांदे घालून केलेले पोहे

पुरणपोळी = पुरण घालून केलेली पोळी

चुलतभाऊ = चुलत्याचा मुलगा

करुणवचन = करुणेने युक्त असे वचन

साखरभात = साखर घालून केलेला भात

बटाटेवडा = बटाटे युक्त वडा

मामेभाऊ = मामाचा मुलगा

नातसून = नातवाची बायको

डाळवांगे = वांगे युक्त डाळ

लंगोटीमित्र = लहानपणाचा मित्र

भोजनभाऊ = भोजनापुरता भाऊ

पावभाजी =  पाव घालून केलेली भाजी

मसालेभात = मसाला घालून केलेला भात

Samas In Marathi - समास व समासाचे प्रकार मराठी मध्ये

3. Dvandva Samas In Marathi – द्वंद्व समास

ज्या समासात अर्थाच्यादृष्टीने दोन्ही पदे समान असतात त्या समासास ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. द्वंद्व समासाचा विग्रह व, आणि, अथवा, किंवा अशा शद्धांनी केला जातो

उदा:- नदीनाले = नदी नाले वगैरे

थट्टामस्करी  = थट्टा मस्करी वगैरे

पाटीपुस्तक = पाटी, पुस्तक, पेन वगैरे

घरदार = घर, दार वगैरे

भाजीभाकरी = भाजी, भाकरी, आमटी वगैरे

चहाफराळ = चहा, फराळ, नाश्ता वगैरे

सुखसमाधान = सुख, समाधान वगैरे

कामधाम = काम, धाम वगैरे

चहापाणी = चहा, पाणी, नाष्टा वगैरे

धनदौलत =  धन, दौलत, संपत्ती वगैरे

कपडालत्ता = कपडा लत्ता वगैरे

या समासाचे तीन प्रकार पडतात.

(अ) इतरेवर द्वंद्व, ब) वैकल्पिक द्वंद्व, क) समाहार द्वंद्व

इतरेवर द्वंद्व समास

Dvandva Samas In Marathi :- (अ) इतरेतर द्वंद्व : विग्रह करताना व, आणि या अव्ययांचा उपयोग करावा लागतो तेव्हा त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.

उदा:- रामकृष्ण = राम आणि कृष्ण

स्त्रीपुरुष = स्त्री आणि पुरुष

विटीदांडू = विटी आणि दांडू

पतीपत्नी =  पती आणि पत्नी

भीमार्जुन =  भीम आणि अर्जुन

मायबाप = माय आणि बाप

लालगुलाबी = लाल आणि गुलाबी

प्रश्नोत्तर = प्रश्न आणि उत्तर

कपबशी  = कप आणि बशी

आवडनिवड = आवड आणि निवड

दिवसरात्र =  दिवस आणि रात्र

आईवडील = आई आणि वडील

सुखदुःख  = सुख आणि दुःख

लुळापांगळा = लुळा व पांगळा

वैकल्पिक द्वंद्व समास

Dvandva Samas In Marathi :- ब) वैकल्पिक द्वंद्व : विग्रह करताना वा, (ब लागतो त्यास ‘वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात

उदा:- खरेखोटे = खरे किंवा खोटे

बरेवाईट = बरे किंवा वाईट

पापपुण्य = पाप किंवा पुण्य

पासनापास = पास किंवा नापास

कमीअधिक = कमी किंवा अधिक

स्पृश्यअस्पृश्य = स्पृश्य किंवा अस्पृश्य

सातआठ =  सात किंवा आठ

हारजीत =  हार किंवा जीत

समाहार इंदू समास

Dvandva Samas In Marathi :- क) समाहार इंदू : विग्रह करताना त्यातील पदाबरोबरच त्याच प्रकारच्या इतर पदार्थाचा समावेश करावा लागतो त्यास ‘समाहार द्वंद्व समास’ असे म्हणतात

उदा:- घरदार = घर, दार, दारासमोरील इतर गोष्टी

मीठभाकर = मीठ, भाकर व इतर पदार्थ

भाजीपाला =  भाजी, पाला, मिरची, कोथिंबीर इतर

साधनसामग्री = साधन सामग्री वगैरे

हावभाव = हाव, भाव वगैरे

हालचाल = हाल, चाल वगैरे

स्नानसंध्या =  स्नान, संध्या वगैरे

वादळवारा  = वादळ, वारा, वावटळ वगैरे

भाऊबंद = भाऊ व इतर नातलग वगैरे

अन्नधान्य = अन्न, धान्य, इतर पदार्थ वगैरे

४. बहुव्रीही समास :

Samas In Marathi :- ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान नसून दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात. बहुव्रीही समासात दोन शद्वांशिवाय तिसरेच पद महत्त्वाचे ठरते.

उदा:- १. गजानन = हत्तीप्रमाणे ज्याचे आनन (तोंड) आहे असा तो.

२. नीळकंठ = निळा असा कंठ आहे असा तो (शंकर)

३. निरक्षर =  नाही अक्षर येत ज्याला असा तो

४. निर्धन  = नाही धन ज्याच्याकडे असा तो

५. अनंत =  ज्याला अंत नाही असा तो

६. दशानन  = ज्याला दहा तोडे आहेत असा तो (रावण)

विभक्ती-बहुव्रीहीचे प्रकार खालीलप्रमाणे

अ) विभक्ती बहुव्रीही : ज्या समासातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून या दोन्हीवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

samas in marathi examples : पुढील तक्त्यामध्ये विभक्ती बहुब्रीहीचे प्रकार वर्णन केले आहेत.

प्रकारसामासिक शदूविग्रहइतर उदाहरणे
द्वितीयाप्राप्तधनप्राप्त आहे धन ज्यास तोआगतसुख
तृतीयाजितेद्रियजिंकलेली आहेत इंद्रिय ज्यानेकृतकृत्य, दत्तधन
चतुर्थीचतुर्भुजचार आहेत भुवा ज्याला तोदेशमुख, दुतोंडा
पंचमीनिर्बलनिघून गेले आहे बल ज्यापासूननिर्धन, गहवैभव
पष्ठीलंबोदरलंब आहे उदर ज्याचे तोभालचंद्र, मानधन
सप्तमीनिर्जळीनाही जळ जिच्यात अशी ती एकादशीभीमादी, पूर्णजल,कृपादी

नवबहुव्रीही समास

आ) नवबहुव्रीही समास : ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल तर त्यास नजबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा:- अनंत = ज्याला अंत नाही असा

अज्ञान = नाही ज्याला ज्ञान तो

निष्प्राण = ज्यात प्राण नाही असा

निरोगी = नाही रोग ज्यात असा

अजाण = जाण नाही असा तो

अनेक = एक नाही असे ते

अथांग = नाही कळत बांग ज्यादा ते

निपुत्रिक = पुत्र नाही ज्याला असा तो.

सहबहुब्रीही समास

इ) सहबहुब्रीही: स, सह, अशा अव्ययांनी आरंभ होणारा बहुव्रीही म्हणजे सहबहुव्रीही समास होय.

उदा:- सहपरिवार म्हणजेच परिवारासह

सहकुटुंब = कुटुंबासहित असा तो

सादर = आदराने सहित ते

सधन = धनाने सहित असा तो

सफल = फलाने सहित असा तो

सुपुत्र = पुत्रासह असा तो

सजीव =  जिवासहित आहेत जी ती

सहर्ष =  हर्षांसह आहे जे ते.

प्रादिबहुव्रीही समास

ई) प्रादिबहुव्रीही : समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसगाँनी बनले असेल तर त्यास प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा:- निर्घृण = निघून गेलेली घृणा (लज्जा) ज्यातून

विधवा = निघून गेले आहे वैधव्य ज्यातून

निष्प्राण = निघून गेले प्राण ज्यातून

निर्देय = निघून गेली आहे दया ज्याची

सुलोचना, दुर्गणी, विरागी, विमुख, निर्धन, दुर्मती, निष्काम, कुरूप ही सर्व प्रादिबहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत.

अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या : समास विकिपीडिया

Saransh Lekhan In Marathi – सारांश लेखन कसे करावे ?

अभ्यास

१. खालील समासांचा विग्रह करा व त्यांना समासाची नावे द्या. नवयुग, ग्रंथकार, यशोदेवी, आत्मकर्तव्य, भाग्योदय, अनंत, नवरदेव, आजन्म, क्षणोक्षणी, नीरस, चद्रास्त, पर्णकुटी, बिनधास्त, वाटसरू, मुखचंद्र, पंधरवडा, प्रदोष, पिंपळपान, त्रिभुवन, यथाक्रम, सातआठ, सुधाकर, पुरुषोत्तम, महात्मा, पंचक्रोशी, अमीर-गरीब.

२. पुढील विग्रहांपासून सामासिक शद्व तयार करून समास सांगा.

भरदिवसांच्या वेळी, तीर्थ आहे पायाशी ज्याच्या, विद्येसाठी गृह, पाच आहेत तोडे ज्याला, शेतात काम करणारा, आठ दिवसांचा समुदाय, ज्याला मरण नाही असा, अन्न, पाणी, इतर पदार्थ वगैरे, युद्धात स्थिर राहणारा, दोन ज्याला मजले आहेत ते, लाच खाणारा, पीत आहे अंबर ज्याचे तो, कुटुंबासहित असा तो, आई आणि वडील.

३. समास म्हणजे काय ते सांगून, त्याचे प्रकार लिहा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *