ling Badla Marathi – माहिती मराठीमध्ये नियम आणि उदाहरणे

ling Badla marathi : नमस्कार मित्रानो मराठी ब्लॉग मधेय आपले स्वागत आहे आज आपण लिंग बदला ling badla, ling badla marathi या मराठी व्याकरणातील महत्वाच्या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत व्याकरण दृष्ट्या लिंग पद्धतीचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. विकारी शब्दांचा अभ्यासामध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे फरक पडतो.

ling Badla Marathi - माहिती मराठीमध्ये नियम आणि उदाहरणे

Table of Contents

1 वर्गात तो मुलगा आहे.

2. ती मुलगी सुरेख गाणे गाते

3. खेळताना मुले खूप ओरडतात,

ling badla marathi वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द म्हणजेच मुलगा, मुलगी, मुले ही सारी सामान्य नामे आहेत. मुलगा हा शद पुल्लिंगी, मुलगी हा शब्द स्वीलिंगी तर मूल हारा नपुंसकलिंगी आहे. लिंग विकारामुळे राद्राच्या रूपात बदल झाले आहेत.

4. सहलीला वीस  मुलगे गेले आहेत.

5. शाळेतील मुलांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला.

नामविकरण : वरील वाक्यात मुलगा शद्राचे ‘मुलगे अनेकवचन झाले तर पुढच्या ‘मूल’ या शहाला ‘नी’ तृतीया विभक्ती प्रत्यय लागून ‘मुलानी’ हे रूप तयार झाले आहे. लिंग विकाराप्रमाणे नामाला वचन व विभक्ती विकार होतात. अशा विकारांना व्याकरणात ‘विकरण’ असे म्हणतात.

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की, कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला ‘लिंग’ असे म्हणतात.

वस्तुच्या पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला लिंग म्हणतात.

आमचे हे देखील आर्टिकल वाचा Air pollution Information In Marathi वायू प्रदूषणाची माहिती

व्याकरणातील लिंग – Ling In Marathi 

व्याकरणात तीन लिंग आहेत.

1. पुल्लिंग, 2. स्त्रीलिंग, 3. नपुंसकलिंग

1. पुल्लिंग ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुलिंग असे म्हणतात. उदा. शंकर, घोडा, बैल, मुलगा, लाडू, रेडिओ, दरवाजा इत्यादी

2. स्त्रीलिंग : ज्या नामावरून सीजातीचा बोध होतो त्यास सीलिंग असे म्हणतात. उदा. मुलगी, गाडी, गाय, म्हैस, आई, आजी, पाटी, काकडी, दोरी, टेकडी, चिमणी, कात्री इत्यादी.

3. नपुंसकलिंग : ज्या नामावरून पुरुषजातीचा किंवा खीजातीचा कोणताच बोप होत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. उदा. अंगण, पुस्तक, मूल, जनावर, घर, टेबल, कुरण, देऊळ, घोडे, हग इत्यादी.

सर्वसाधारणपणे गुण पाहून लिंग ओळखले जाते. जर जोर, कठीणपणा, शक्ती, ताकद हे गुण असल्यास ते पुल्लिंग म्हटले जाते. नाजूकपणा, सुंदरता, कोमलता यांसारखे गुण पाहून स्त्रीलिंग म्हटले जाते. तर लघुत्व, गौणत्व, क्षुद्रत्व यासारखे गुण पाहून नपुंसकलिंग म्हटले जाते.

लिंग कसे ओळखावे – ling in marathi

१. कोणत्याही शब्दामागे ‘तो’ है सर्वनाम लावता येईल तो राष्ट्र पुल्लिंग होय.

२. कोणत्याही शब्दामागे ‘ती’ हे सर्वनाम लावता येईल तो शूद्र स्त्रीलिंग होय.

१३. कोणत्याही शब्दामागे ‘ते’ हे सर्वमान लावता येईल. तो महणजे नपुंसकलिंग होय 

एकाच अर्थाचे शब्द तिन्ही लिंगांत आढळतात.

आमचे हे देखील आर्टिकल वाचा :  Nibandh Lekhan In Marathi – यशस्वी निबंधलेखनासाठी प्रभावी मार्गदर्शिका

Nibandh Lekhan In Marathi – यशस्वी निबंधलेखनासाठी प्रभावी मार्गदर्शिका
पुल्लिंगस्त्रीलिंगनपुसकलिंग
देवदेवीदैवत
ग्रंथपोथीपुस्तक
दगडखड़ीखडक
देहकायाशरीर
दोरादोरीदोर

निर्जीव वस्तुंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तुच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण त्यांचे लिंग ओळखतो.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुसकलिंग
तो वाडाती इमारतते घर
तो कंदीलती पणतीते तेज
तो भातती चपातीते कालवण
तो टाकती लेखणीते पेन
तो कागदती वही ते पुस्तक
तो दरवाजाती खुर्ची ते टेबल

Ling Badla Marathi  – लिंगबदल करण्याचे काही नियम

लिंग बदल करण्यासाठी व्याकरणात काही नियम ठरवले आहे. आम्ही खाली लिंग बदल करण्याचे नियम दिलेले आहेत

नियम १ : ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते. तो नपुंसकलिंगी रूप ‘ए’ कारान्त होते.

पुल्लिंग (‘आ’ कारान्त)स्त्रीलिंग (‘ई’ कारान्त)नपुसकलिंग(‘ए’ कारान्त)
मुलगामुलगीमुलगे
कोल्हाकोल्हीकोल्हे
घोडाघोड़ीघोडे
कुत्राकुत्रीकुत्रे
रेडारेडीरेडकू
पुरुषस्त्री मूल

नियम २ : ‘आ’कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’कारान्त होते.

नातेवाचक
पुल्लिंगस्त्रीलिंग
काकाकाकी
मामामामी
आजाआजी
चुलताचुलती
दादावहिनी
बाबाआई
पदार्थवाचक
पुल्लिंगस्त्रीलिंग
दांडादांडी
फळाफळी
कड़ाकडी
खळगाखळगी
भाकराभाकरी
पाटपाटी
दोरादोरी
काटाकाटी

नियम ३ : काही ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी ‘ई’कारान्त होते.

पुल्लिंग (‘आ’ कारान्त)स्त्रीलिंग (‘ई’ कारान्त)
तरुणतरुणी
दासदासी
मृगमृगी
हरीणहरिणी
वानरवानरी
मगरमगरी
घोडाघोडी

नियम ४ : ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप ‘आ’कारान्त होते.

पुल्लिंग ‘अ’कारान्तस्त्रीलिंग ‘आ’कारान्त
चंद्रचंद्रिका
शिक्षकशिक्षिका
गायकगायिका
नायकनायिका
दर्शकदर्शिका
रसिकरसिका
बालकबालिका
देवदेविका
पत्रकपत्रिका

नियम ५ : ‘ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘इन’ कारान्त होते.

पुल्लिंग ‘अ’कारान्तस्त्रीलिंग ‘ई’कारान्त
मालकमालकीण
बाघवाघीण
सोनारसोनारीण
डॉक्टरडॉक्टरीण
नाईकनाईकीण
कोळीकोळीण
गुरवगुरवीण
गवळीगवळीण
कासारकासारीण

मराठीतील काही शब्द समलिंगी असतात तर काही निरनिराळ्या लिंगांतही आढळतात.

बागपु. स्त्रीतंबाखूपु. स्त्री
पोरपु. स्त्रीनेत्रपु, नपु
वीणापु. स्त्रीमूलपु. स्त्री
संघीपु. स्त्रीवेळपु. स्त्री
मजापु. स्त्रीहरीणपु, नपु

शब्दांची अनियमित स्त्रीलिंगी रूपे

पुल्लिंगस्त्रीलिंगपुल्लिंगस्त्रीलिंग
राजाराणीपुरुषसी
पतीपत्नीनरमादी
भाऊबहीणबोकाभाटी
वरवधूबोकडशेळी
पितामाताउंटसांड
सासरासासूरेडाम्हैस
सम्राटसम्राज्ञीविधुरविधवा
युवकयुवतीदीरजाऊ
भगवानभगवतीमित्रमैत्रीण
पुत्रपुत्रीखोंडकालवड
नवराबायकोविद्वानविदुषी
श्रीमानश्रीमतीमोरलांडोर
शंकरपार्वतीचंद्रचंद्रिका

परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शद्वाच्या लिंगावरून ठरवितात.

पेन्सिललेखणीस्त्रीलिंग
बुकपुस्तकनपुंसकलिंग
बूटजोडापुल्लिंग
क्लासवर्गपुल्लिंग
ट्रैकपेटीस्त्रीलिंग
कंपनीमंडळीस्त्रीलिंग
हॉस्पिटलदवाखानापुल्लिंग
हाऊसघरनपुंसकलिंग
स्कूलशाळास्त्रीलिंग
क्लॉकघड्याळनपुंसकलिंग

आमचे हे देखील आर्टिकल वाचा : Gola Fek Information In Marathi – गोळाफेकेची माहिती मराठीमध्ये

निष्कर्ष – Conclusion

आमचा ling badla marathi हा आर्टिकल कसा वाटला आम्हाला कंमेंट सेकशन मधेय सांगायला विसरू नका . व लिंग बदला या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी या वेबसाईट वर भेट द्या विकिपीडिया

विचारले जाणारे प्रश्न

व्याकरणात किती लिंग आहेत ?

व्याकरणात तीन लिंग आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग

व्याकरणात लिंग म्हणजे काय ?

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की, कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला ‘लिंग’ असे म्हणतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *