Air pollution Information In Marathi वायू प्रदूषणाची संपूर्ण माहिती

Air pollution Information In Marathi : मित्रानो आजचा ब्लॉग मधून आपण Air pollution वायू प्रदूषणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वायू प्रदूषण म्हणजे काय? वायू प्रदूषण होण्या मागील कारण, वायू प्रदूषणाचे प्रकार आणि परिणाम, वायू प्रदूषण कश्याप्रकारे कमी करू शकतो? हि संपूर्ण माहिती यामाध्यमातून तुम्हाला मिळणार आहे.

Air pollution Information In Marathi वायू प्रदूषणाची संपूर्ण माहिती

वायू प्रदूषण म्हणजे काय ? – Air pollution Information In Marathi


Air pollution Information In Marathi पृथ्वीचा वातावरणात अनेक प्रकारचे वायू असतात. यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डॉक्सिडेंसह अनेक वायू समाविष्ट होतात. वातावरणातील अशा वायूनमध्ये विविध प्रकारचे प्रदूषक असून हे प्रदूषक पर्यावरनासाठी आणि मानवी जीवनासाठी धोकेदार असतात. रसायने, धूळ, विषारी वायू, सेंद्रिय पदार्थ, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्सिइड आणि इतर प्रदूषकांमुळे वायू प्रदूषण होते. जागतिक आरोग्य संघटने नुसार, जगभरात वायू प्रदूषणमुळे दरवर्षी ७ दशलह मृत्यू होत असतात

वायू प्रदूषणाच कारण ( Causes of Air Pollution ) –

  • वाहने – जीप व बससारख्या वाहनातून विसर्जित होणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड (CO) पर्यावरणासाठी खूप हानिकारक असतो. कार्बन मोनोऑक्साइडमुळे (CO) मानवी जीवनात अनेक प्रकारचे रोग पसरतात
  • शेती – शेती करत असताना अनेक वापर करत असलेल्या कीटकनाशक आणि खतानमुळे अनेक प्रकारचे हानिकारक वायू हवेत विराजित होतात. अमोनिया हा शेतीतून विसरजीत होणारा सर्वात धोकादायक वायू आहे.
  • जीवा श्म इंधन( Fossil Fuels ) – मोठ्या प्रमाणत जीवाश्म इंधनचे ज्वलन केल्यामुळे वातावरणाला हानिकारक असणारा सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सोडला जातो यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते
  • औद्योगिक संस्था – कारखाण्यातून आणि इतर औद्योगिक संस्थामधून विविध प्रकारचे विषारी वायू हवेत सोडले जातात यामुळे हवा प्रदूषित होऊन वायू प्रदूषण वाढते
  • खाणकाम – अनेकदा खाणकाम करताना पृथ्वीचा पृष्ठभागावर धूळ आणि केमिकल विसरजीत होते यामुळेही वायू प्रदूषण होते

आमच्या ब्लॉग वरचे सगळे पोस्ट पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा : FactCurrent.com

वायू प्रदूषणचे परिणाम ( Effect of Air Pollution )

मानवी जीवनावर वायू प्रदूषणाचे परिणाम –

वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर मोठा प्रमाणात फरक पडतो. वायू प्रदूषणामूके श्वसनाचे संक्रमण, हृदयविकार आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा दोख वाढतो. स्ट्रोक, इस्केमिक हृदयरोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) यांसारखे रोग वायू प्रदूषणामुळे होण्याची शक्यता असते. मुले, वृद्ध आणि गरीब लोक जास्त संवेदनशील असतात त्यामुळे त्याना प्रदूषणाचा परिणाम अधिक प्रमाणात होतो.

पर्यावरणावर वायू प्रदूषणाचा परिणाम –

Air pollution Information In Marathi विविध प्रकारचा दूषित वायूच्या उत्सर्जनमुळे हवेतील वायूत असंतुलन होते, त्यामुळे पृथ्वीचा तापमानात वाढ होऊन ग्लोबल वॉर्मिंग वाढते. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्या मुले पृथीवरील बर्फ वितळत जात आहे त्यामुळे दिवसेन-दिवस समुद्र पातळीत वाढ होत आहे.कमी होणाऱ्या ओझोन लेयर मुळे सूर्यपासून हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण पृथिवीचा पृष्ठ भागावर पडतात यामुळे तापमान वाढून मानवी जीवनाला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. \ विविध कारखाण्यातून आणि मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचे ज्वलन केल्यामुळे हवेतील नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड.पसरतो त्यामुळे आम्ल वर्षा ( acid rain ) होण्याची शक्यता वाढते. आम्ल वर्षा ही प्राणी, पक्षी आणि इतर पर्यावरणातील घटकांना हानिकारक असते.

भारतातील वायू प्रदूषण ( Air Pollution in India )


वायू प्रदूषणाची सर्वात जास्त वार्षिक पातळी असलेली जगातील २० शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. 51% प्रदूषण उदयोग क्षेत्रामुळे, 27% वाहनांमुळे, 17% शेताचा पीक जाळल्यामुळे आणि 5% इतर स्त्रोतांमुळे होत असत. भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर सारख्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात वायू प्रदूषण आढळते. भिवाडी, राजस्थान हे भारतातील सर्वात वायू प्रदूषित शहर आहे.

वायू प्रदूषण नियंत्रण ( controlling of air pollution )


Air pollution Information In Marathi वायू प्रदूषण नियंत्रीत आण्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक आहेत :

  • १. सार्वजनिक वाहतूकचा वापर वाढवून खाजगी गाडयांचा वापर कमी करावा यामुळे रस्यावर कमी संख्येत वाहनांची संख्या कमी होऊन वायू प्रदूषणाला आळा घालायला मदत होते.
  • २. लोकांना छोट्या अंतरावर चालून किंवा सायकलिंग करून जाण्यासाठी प्रोसाहित करून दूषित वायूचे उर्त्सजन कमी होते
  • ३. कोळसा आणि अनुऊर्जेचा वापर कमी करून नवीन ऊर्जेचे स्रोत नितर्मान करणे
  • ४. सर्वाना वायू प्रदूषणची माहिती देऊन निसर्गाला वाचवण्याची जाणीव करून देणे.
  • ५. वायू प्रदूषण नियंत्रित आणण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षरोपंन करून कार्बोन डॉऑक्सिडेंचे प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनचे वाढवूं पर्यांवरण संतुलित करणे.
  • ६. नसर्गिक उर्जेचे वापर करून इतर हानिकारक उर्जेचा वापर कमी करून वायू प्रदूषण नियंत्रित आणणे

अधिक माहिती साठी विकिपीडिया या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया

विचारले जाणारे प्रश्न

वायू प्रदूषण म्हणजे काय?

वायू प्रदूषण म्हणजे पृथ्वी च्या वातावरणात हानिकारक वायू अधिक प्रमाणात उत्सर्जित होतात ह्याचे कारण नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते जसे कि फॅक्टरी किंवा कार या मुळे वायू प्रदूषण वाढू शकते

वायू प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत?

वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहन, उद्योगधंदा, पॉवर प्लांट, बांधकाम , कृषी व जंगलात लागलेली हे आग वायू प्रदूषणाचे कारण बनते

वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो?

वायू प्रदूषणाचा मानवी जीवनावर घातक परिणाम होतो. जसे कि फुफ्फुसाचा कर्करोग आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या

वायू प्रदूषणाचे पर्यावरणावर काय परिणाम होतात?

वायूप्रदूषण पर्यावरणास हानी पोचवू शकते जसे कि वनस्पतींचे नुकसान. पाण्याचे आम्लीकरण . किंवा मानवी जीवनातील समस्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *